जिवंतपणे स्वर्ग बघायचाय; डोळ्यांना स्वर्गसूख देणाऱ्या पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध पर्यटन स्थळाला एकदा भेट द्याच
Pune Best Picnic Spot : महाराष्ट्रात फिरण्यासारखी अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी पर्यटक लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पर्यटक फिरायला निघतात. सध्या राज्यात ऑक्टोबर हिटचा मोठा तडाखा बसत आहे.
वाढत्या तापमानामुळे नागरिक बेजार झाले आहेत. यामुळे अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. जर तुम्हीही कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी पुण्यातील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण पुण्यातील एका अद्भुत किल्ल्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर राज्यात असे अनेक किल्ले आहेत जे दुर्गप्रेमींना भुरळ घालतात.
डोंगरदऱ्या, टेकड्यांवर वसलेले हे किल्ले दुर्गप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाहीत. राज्यातील किल्ल्यांना दुर्गप्रेमी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात. पुण्यातील जीवधनं किल्ल्याला देखील हजारोंच्या संख्येने दुर्गप्रेमी भेटी देतात. पर्यटकांमध्ये हा किल्ला नेहमीच लोकप्रिय राहिलेला आहे.
नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण हा किल्ला दुर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. या किल्ल्याला दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात आणि आपल्या ट्रिपचा आनंद घेतात.
असे सांगितले जाते की, हा जीवधन किल्ला नाणेघाट येथील व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी विकसित करण्यात आला होता. हा घाटघरच्या परिसरात असलेला एक पूर्वाभिमुख म्हणजेच सूर्यदर्शनी किल्ला आहे. हा किल्ला नाणेघाटापासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलेला आहे. या किल्ल्यावर पश्चिम दरवाजाने पोहोचल्यानंतर तेथे एक गजलक्ष्मीचे शिल्प आहे. या गजलक्ष्मीच्या शिल्पाला कोठी म्हणून ओळखले जाते. किल्ल्यावर जिवाई देवीचे मंदिर देखील आहे.
हे मंदिर खूपच प्राचीन असून सध्या स्थितीला मंदिराची अवस्था बिकट झालेली आहे. गडाच्या अंतर्भागात धान्याची कोठारे देखील पाहायला मिळतात. हा गड आयताकार असून या गडाच्या टोकाला सुमारे 350 फूट उंचीचा वानरलिंगी उर्फ खडा पारशी नावाचा एक सुळका आहे. येथे अनेक प्राचीन मंदिरे देखील पाहायला मिळतात.
यामुळे जर तुम्ही कुठे फिरायचा प्लॅन बनवला असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन कॉलिटी टाईम स्पेंड करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हा किल्ला एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या किल्ल्यावर नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते.
पावसाळ्याच्या काळात ट्रेकर्स मोठ्या प्रमाणात या किल्ल्यावर भेटी देतात. जर तुम्हीही तुमच्या बीजी शेड्युलमधून वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यास इच्छुक असाल तर तुम्ही येथे नक्कीच भेट दिली पाहिजे.