नवी दिल्ली : साऊथचा सुपरस्टार महेश बाबू अभिनयाच्या माध्यमातून करोडो लोकांची मने तर जिंकतोच, पण या गुणाव्यतिरिक्त त्याच्या व्यक्तिरेखेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. अभिनेत्याच्या व्यक्तिमत्त्वात त्याची डॅशिंग शैली आणि त्याचे भावही अप्रतिम आहेत. या सर्वांशिवाय महेश बाबू हा दयाळू मनाचा व्यक्ती आहे जो नेहमीच अनेकांना मदत करताना दिसतो. 2 मुलांचा बाप असलेला हा अभिनेता आपल्या फाउंडेशन अंतर्गत अनेक अनाथ आणि निराधार लोकांना मदत करतो. नुकतेच जागतिक आरोग्य दिनानिमित्त अभिनेत्याने ३० हून अधिक मुलांचे प्राण वाचवले आहे.
सुपरहिट चित्रपट देण्यासोबतच तेलुगू सुपरस्टार महेश बाबू हे त्यांच्या समाजसेवा कार्यासाठी देखील ओळखले जातात. अलीकडेच अभिनेत्याने आंध्र हॉस्पिटल, विजयवाडा आणि महेश बाबू फाउंडेशनच्या डॉक्टरांच्या मदतीने 30 मुलांवर हृदय शस्त्रक्रिया केल्या. महेश बाबू यांची पत्नी नम्रता शिरोडकर हिने तिच्या इंस्टाग्रामवर आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वा भूषण हरिचंदन यांनी कार्यक्रमाची सोय केल्याबद्दल आणि त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
नम्रताच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जागतिक आरोग्य दिनानिमित्त ३० मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या कार्याचे आयोजन माननीय राज्यपाल श्री विश्वभूषण हरिचंदन गरू यांनी केले होते. नम्रताने पुढे माहिती दिली की, “वैद्यकीय उत्कृष्टता आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल @andhrahospitals टीमचे आभार.’ नम्रताने महेशच्या आर्थिक मदतीसह शस्त्रक्रिया झालेल्या मुलांचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
2019 मध्ये महेश बाबूने आंध्र हॉस्पिटल आणि Healing Little Hearts नावाच्या NGO सोबत काम करायला सुरुवात केली होती. आतापर्यंत त्यांनी 1000 हून अधिक मुलांच्या शस्त्रक्रिया स्पॉन्सर केल्या आहेत. त्याचे सहकलाकार आणि चाहते त्याच्या या कामाबद्दल नेहमीच त्याचे कौतुक करतात. गरीब मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यासोबतच अभिनेता अधिकाधिक सामाजिक कार्य देखील करतो. 2016 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशातील बारीपालम आणि तेलंगणातील सिद्धपुरम गावेही दत्तक घेतली, त्यानंतर त्या गावांमध्ये खूप विकास झाला आहे. तिथले लोक महेशला देवासारखे पूजतात असे म्हंटले जाते.