नवी दिल्ली : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राची देसी स्टाईल पुन्हा एकदा पाहायला मिळाली. तिने पती निक जोनससोबत विदेशात थाटामाटात होळी साजरी केली. प्रियांकाचे होळीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका आणि निक होळीसोबतच प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसले.
प्रियांका चोप्राने भारतापासून दूर राहूनही आपल्या मातृभूमीचा सुगंध जिवंत ठेवला आहे. भारतातील प्रत्येक सण ती मोठ्या थाटामाटात साजरी करते. यावेळी प्रियांका चोप्राने होळी जोरदार साजरी केली आहे. संपूर्ण जोनस कुटुंब होळीच्या रंगात रंगलेले दिसले. काही फोटोंमध्ये प्रियांका आणि निक प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसले.
प्रियांका चोप्रा होळीच्या निमित्ताने पांढऱ्या रंगाचा सूटमध्ये दिसली, तर निकने प्रिंटेड शॉर्ट्ससह पांढरा शर्ट घातला होता, सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये प्रियंका तिच्या नवऱ्याला किस करताना दिसली. यासोबत ती रंगात मग्न झालेली देखील दिसली.
प्रियांका चोप्रासाठी हे वर्ष खूप खास आहे. वर्षाच्या सुरुवातीला प्रियांका आई झाली. अभिनेत्रीने अद्याप चाहत्यांना मुलीची पहिली झलक दाखवली नाही.