मुंबई : प्रियंका चोप्राने मंगळवारी लॉस एंजेलिसमधील मेड इन इंडिया मॅनहोलच्या कव्हरसमोर एक फोटो शेअर केला आहे. शहरातील रस्त्यांवर या मेड इन इंडिया गोष्टीची झलक प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. प्रियांकासोबत तिची भाची कृष्णा देखील या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये प्रियांका फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. ती मॅनहोलच्या कव्हरच्या शेजारी बसलेली दिसली आणि रॉकस्टरची चिन्हे दाखवतानाही दिसली.
या फोटोसह प्रियांकाने लिहिले, “मेड इन इंडिया.” या पोस्टमध्ये प्रियांकाने चुलत बहीण दिव्या ज्योती आणि त्यांची मुलगी कृष्णा यांनाही टॅग केले आहे. प्रियांकाला रविवारी हा मॅनहोल दिसला होता. ती तिचा पती आणि गायक निक जोनासची बेसबॉल मॅच पाहणार पाहायला गेली होती.
प्रियंका चोप्राने यापूर्वी निक जोनास बेसबॉल खेळतानाचे अनेक फोटो शेअर केले होते. तर प्रियांका त्याला स्टँडवरून खेळताना पाहत होती. यासह प्रियांकाने मैदानावरील देखील काही फोटो शेअर केले होते.