मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आपली खास ओळख निर्माण केली आहे. प्रियांका सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकतंच प्रियांकाने काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तीचे चाहते खूप खुश झालेत. चाहत्यांना हे फोटो खूप आवडलेत.

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे चार फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये प्रियांका पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तिच्या चारही फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिच्या पोज देण्याच्या अंदाजवरून प्रियांका किती खुश आहे, हे दिसत आहे. तसेच, या फोटोंप्रमाणे सुंदर असं कॅप्शन प्रियंकाने या पोस्टला दिले आहे. त्यात तिने लिहिले की, ‘जेव्हा सूर्य अगदी बरोबर येतो’.

प्रियांकाने या वर्षी 22 जानेवारीला सरोगसीद्वारे मुलाची आई झाल्याची माहिती दिली होती. प्रियांका सद्या तिचा पती निक जोनस आणि आपल्या बाळासोबत मातृत्वाचा आनंद घेत आहे. दरम्यान, प्रियांका चोप्रा या आगामी चित्रपट ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे.