
मुंबई : प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या बाहुबली या चित्रपटाचे किस्से जगभर प्रसिद्ध आहेत आणि या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत असल्याचं ऐकायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मारुती एक चित्रपट बनवत आहे. या चित्रपटाचे नाव ‘राजा डीलक्स’ असे असणार आहे. या चित्रपटात प्रभास आणि अनुष्काला पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार आहेत.
‘राजा डीलक्स’ हा चित्रपट हॉरर-कॉमेडी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘राजा डिलक्स’ या चित्रपटाचे शूटिंग फक्त ५० दिवसांत केले जाणार आहे आणि हा चित्रपट एक मसाला मनोरंजन करणारा असेल जो सर्वच प्रेक्षकवर्गाच्या पसंतीस उतरेल.
या चित्रपटात प्रभास फक्त अनुष्का शेट्टी सोबतच नाही तर मालविका मोहनन आणि श्रीलालासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या बाहुबली जोडीला पुन्हा एकत्र पाहण्याची लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे. चित्रपटाचे संगीत एस.थामन यांनी दिले असून हा चित्रपट’आदिपुरुष’ चित्रपटापूर्वी प्रदर्शित होणार आहे.
‘राजा डिलक्स’मध्ये मेहरीन पीरजादा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे आधी बोलले जात होते, मात्र आता अनुष्काच्या एन्ट्रीची बातमी आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असून, चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांनी आवडती जोडी एकत्र दिसणार आहे.