Post Office : पैश्याची गुंतवणूक (Investment) करणे नेहमी फायद्याचे राहते. जर तुम्हाला सुद्धा पैश्यांची योग्य गुंतवणूक करावयची असेल तर पोस्ट ऑफिसची ही स्कीम तुम्हाला फायद्याची ठरू शकते. जाणून घ्या याबद्दल.

ग्राम सुरक्षा योजना म्हणजे काय?

ही योजना पोस्ट ऑफिसच्या (Post Office) ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेंतर्गत चालवली जाते. या योजनेत छोटी गुंतवणूक करून तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. या योजनेंतर्गत, तुम्ही दररोज 50 रुपयांची छोटी गुंतवणूक करून म्हणजेच दरमहा रु. 1500 गुंतवून मॅच्युरिटीवर रु. 35 लाखांचा निधी मिळवू शकता. ही योजना खास ग्रामीण लोकांसाठी तयार करण्यात आली आहे.

ग्राम सुरक्षा योजनेचे तपशील येथे जाणून घ्या

तुम्ही या (Gram Suraksha Yojana) योजनेत 19 ते 55 वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करू शकता.
या योजनेत, तुम्हाला किमान 10,000 रुपये आणि कमाल 10 लाख रुपयांची विमा रक्कम मिळू शकते.
ग्राम सुरक्षा योजनेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रीमियम निवडू शकता. तुम्ही प्रत्येक महिना, तीन महिने, 6 महिने किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.
या योजनेत गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा मिळते. ही सुविधा तुम्ही 4 वर्षांनी घेऊ शकता.
तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमची पॉलिसी घेतल्यानंतर 3 वर्षांनी सरेंडर करू शकता. जर तुम्ही पॉलिसी घेतल्यापासून 5 वर्षांच्या आत सरेंडर केली तर तुम्हाला त्यावर बोनस मिळणार नाही.

मृत्यू लाभ मिळवा

या पॉलिसीची मॅच्युरिटी कमाल 80 वर्षांपर्यंत असावी. जर एखाद्या गुंतवणूकदाराचा पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला मृत्यू लाभाचा लाभ मिळतो. नॉमिनी पॉलिसीवर दावा करू शकतो आणि बोनससह संपूर्ण ठेव रक्कम मिळवू शकतो.