मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका बऱ्याच दिवसांपासून अभिनेते किरण माने यांच्यामुळे चर्चेत आली आहे. या वादाचा फायदा मालिकेच्या टीआरपीत झालेला नक्की पाहायला मिळाला. नंतर घराघरात लोकप्रिय झालेली ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. या मालिकेच्या जागी लवकरच स्टार प्रवाह वाहिनी नवी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

माहितीनुसार, स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित केला जाईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर येत्या २ मे पासून ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकची कथा एक लहान मुलगी आणि तिचे गाणे यावर आधारित आहे. स्टार प्लसवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचा ही मालिका मराठी रिमेक असणार आहे. या मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार असणार, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.