मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा हेगडे आणि सुपरस्टार प्रभास यांचा ‘राधेश्याम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, या चित्रपटानंतर पूजा आणि प्रभास यांच्यात वाद सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या. ज्यामुळे पूजा खूप चर्चेत आली होती. या बातम्यांवर आता पूजा हेगडेने अखेर आपलं मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, तीने या सर्व चर्चांचे खंडनही केले आहे.

पूजा हेगडेने प्रभाससोबत सुरू असलेल्या भांडणावर
माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सकारात्मक बातम्यांपेक्षा नकारात्मक गोष्टी जास्त पसरतात. अर्थात बातम्या खऱ्या नसतील पण लोकांना त्याबद्दल बोलायला आवडते. मला माझ्या आयुष्यात फक्त सकारात्मक व्हायब्स हवे आहेत. प्रभास आणि माझ्या वादाचे हे वृत्त पूर्णपणे खोटे आहेत. प्रभास आणि मी एकमेकांचा आदर करतो आणि नेहमी एकमेकांची प्रशंसाही करतो. त्याच्यासोबत काम करणे खूप छान होते. या अफवा कुठून सुरू झाल्या हे मला माहीत नाही. आमच्यामध्ये सर्व काही ठीक आहे.” असं पूजा म्हणाली.

दरम्यान, ‘राधे शाम’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट एका प्रेमकथेवर बनवला गेला आहे, ज्यामध्ये प्रभासचे वर्णन एक महान ज्योतिषी असे केले आहे. ज्याला वर्तमानापासून भविष्यापर्यंत सर्व काही माहित आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम या चार वेगवेगळ्या भाषांमध्ये 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या अपेक्षेनुसार चित्रपट मात्र, आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही.