Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

काय सांगता ! पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता 3 हजार रुपयाचा मिळणार ? समोर आली नवीन अपडेट

0

Pm Kisan Yojana : केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने सुद्धा शेतकऱ्यांसाठी शेकडो योजना राबवल्या आहेत. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेचा देखील समावेश होतो.

ही एक शेतकरी हिताची प्रमुख आणि केंद्राची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेत या योजनेचा समावेश केला जातो. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ पुरवला जात आहे.

दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण तीन हप्त्यांमध्ये हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 14 हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

मागील 14 वा हफ्ता हा 27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. राजस्थान येथे आयोजित एका शेतकरी कार्यक्रमादरम्यान मागील 14 वा हप्ता देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.

खरंतर या योजनेचा हफ्ता दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. अर्थातच आता या योजनेचा 14 वा हफ्ता जमा होऊन जवळपास साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. यामुळे लवकरच या योजनेचा पंधरावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुढील पंधरावा हप्ता दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे वृत्तसमोर आले होते. मात्र सध्या तरी याबाबत शासन स्तरावर कुठल्याच हालचाली पाहायला मिळत नाहीयेत. यामुळे या योजनेचा पुढील हप्ता हा दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

तथापि, याबाबत अजूनही केंद्र शासनाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. अशातच मात्र पीएम किसान योजनेच्या रकमेमध्ये सरकारकडून वाढ केली जाणार असल्याचा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान योजनेच्या सहा हजार रुपयात आता तीन हजार रुपयांची भर घातली जाणार आहे.

म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत आता वार्षिक 9 हजार रुपये मिळतील असा दावा केला जात आहे. म्हणजेच 2 हजार रुपयांचा हप्ता वाढून आता 3,000 रुपयांचा होईल असे सांगितले जात आहे. पीएम किसानचा पंधरावा हफ्ता देखील दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपयाचा होऊ शकतो असे सांगितले जात आहे.

पण सरकारकडून मात्र याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जेव्हा जमा होईल तेव्हाच याबाबत योग्य ती स्पष्टोक्ती येऊ शकणार आहे.