गुड न्युज ! पीएम मोदी झारखंडमधून बटन दाबून वितरित करणार पीएम किसानचा 15वा हफ्ता, 15 नोव्हेंबरला किती वाजता खात्यात जमा होणार रक्कम ? वाचा…
Pm Kisan Yojana Latest Update : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारची एक महत्वाची योजना आहे. ही एक 100% केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेसाठी संपूर्ण निधी केंद्र शासनाकडून पुरवला जात आहे.
या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. दोन हजार रुपयाचा एक हप्ता अशा समान तीन हप्त्यांमध्ये या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 14 हप्ते देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे या योजनेचा पंधरावा हफ्ता देखील आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्रीय कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा पंधरावा हप्ता उद्या अर्थातच 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.
पंतप्रधान मोदी वितरित करणार 15वा हफ्ता
मीडिया रिपोर्ट नुसार, या योजनेचा पंधरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे. उद्या पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर असताना PM Kisan चा 15वा हफ्ता देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत.
कृषी विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 15 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करणार असल्याचे सांगितले जात आहे. या हफ्त्यापोटी 18 हजार कोटी रुपये संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
उद्या भाऊबीज आहे यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही भाऊबीजची एक मोठी भेट राहील अस मत व्यक्त केले जात आहे. तथापि, या योजनेचा पंधरावा हप्ता त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी पीएम किसानसाठी आवश्यक असलेली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली असेल.
तसेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारसोबत संलग्न असेल म्हणजेच लिंक असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी जमीनीच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केलेली असेल अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा आगामी हप्ता म्हणजेच उद्या दिला जाणारा पंधरावा हप्ता मिळणार आहे.