PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. मात्र या एखाद्या लाभार्थी मृत्यू पावल्यास या योजनेचा लाभ कसा घ्यावा, जाणून घ्या याबद्दल.

या योजनेद्वारे केंद्र सरकार (Narendra Modi) दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये जमाकरते. हे पैसे एकूण तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात. ही योजना सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी, योजनेशी संबंधित माहिती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर करण्यात आली आहे. नियमानुसार प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळतो.

आता सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की जर एखाद्या लाभार्थीचा मृत्यू झाला तर अशा स्थितीत वारसाला या योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ मिळणार की नाही. या प्रश्नाचे उत्तर सरकारने दिले आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला योजनेचे पैसे मिळतील की नाही हे जाणून घेऊया-

लाभार्थी झाल्यानंतर कुटुंबाला योजनेचा लाभ मिळणार की नाही?

उत्तर प्रदेश सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर (Beneficiary Dies) योजनेच्या लाभाशी संबंधित काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांनुसार मृत शेतकऱ्याच्या वारसालाही या योजनेच्या सर्व अटींची पूर्तता केल्यास या योजनेचा लाभ मिळू शकतो, मात्र त्यासाठी वारसाला पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करावी लागेल.

जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्या तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळेल. तुम्हाला पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावांची यादी तपासायची असेल, तर तुम्ही ती ऑनलाइन सहज तपासू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन अर्जही करू शकता.

पीएम किसान योजनेसाठी याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करा

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर वेबसाइटच्या होम पेजवर उपस्थित असलेल्या फार्मर्स कॉर्नरवर जा.
येथे तुम्हाला New Farmer Registration वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्ही तुमचा आधार क्रमांक येथे टाका आणि नंतर कॅप्चा कोड भरा.
यानंतर Click Here to Continue या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्ही अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि फॉर्म सेव्ह करा.
अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज पूर्ण कराल.
आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही मोबाईल किंवा CSC सेंटरवर जाऊन हे अॅप्लिकेशन मिळवू शकता.
पीएम किसान योजनेच्या यादीत तुमचे नाव असे तपासा-

यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, त्यावर क्लिक करा.
येथे तुम्हाला Beneficiaries List चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक तपशील येथे भरा.
त्यानंतर Get Report पर्याय निवडा.
जर तुम्हाला या यादीत नाव दिसले तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.