केंद्र सरकार (Central Government) लवकरच शेतकऱ्यांना खूशखबर देणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 11वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.
तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल, तर ती त्वरित पूर्ण करा. मोदी सरकारने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 10 हप्ते हस्तांतरित केले आहेत. आता शेतकरी पुढच्या म्हणजे 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आले. देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला.
ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. अशाप्रकारे ही योजना सुरू होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये जमा केले जातात. दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये ट्रान्स्फर केले जातात. ई-केवायसी (E-KYC) केल्यानंतरच तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळतील, त्यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन तुमची माहिती भरावी लागेल.
याप्रमाणे ई-केवायसी करा –
– पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
– होम पेजच्या उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner)’ नावाच्या लिंकवर क्लिक करा.
– आता e-KYC या पहिल्या पर्यायावर क्लिक करा.
– आता तुमचा आधार कार्ड (AADHAAR CARD) क्रमांक टाका.
– कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि शोध वर क्लिक करा.
– आता आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
– तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल, तो टाका.
– तुमचे आधार कार्ड लिंक केले गेले आहे आणि ई-केवायसी पूर्ण झाले आहे.
या योजनेचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान येतो. त्याच वेळी, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केला जातो. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्त्याची रक्कम जमा करता येणार आहे.
तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची –
– पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
– वेबसाइटच्या उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ वर क्लिक करा
– आता पर्यायातून लाभार्थी स्थितीवर क्लिक करा
– स्थिती तपासण्यासाठी, तुम्हाला काही तपशील जसे की आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करणे आवश्यक आहे
– ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे नाव यादीत आहे की नाही याची माहिती मिळू शकते.