pm kisan samman nidhi yojana
pm kisan samman nidhi yojana

गेल्या अनेक दशकांपासून देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारे सर्व प्रकारची पावले उचलत आहेत, पण आजही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही. कर्जबाजारीपणामुळे दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) करतात.

शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana) आणली होती, ज्याअंतर्गत दरवर्षी करोडो शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात. असे मिळून शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये एकूण सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत सरकारने पीएम किसानच्या 10 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांना पाठवले आहेत.

आता पुढील म्हणजे 11व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. पीएम किसानच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांनी अकराव्या हप्त्याची रक्कम शेतकर्‍यांना ट्रान्स्फर (Transfer) केली जाणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

तुम्ही पात्र नसाल तर पैसे घेऊ नका –
तसेच अनेक लोक पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरतात, ज्यामुळे ते अडकतात. जर तुम्ही काही चुका करून पीएम किसान योजनेचे पैसे घेत असाल तर ते विसरूनही करू नका.

यामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल. खरं तर पंतप्रधान किसान योजना सुरू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. मात्र यादरम्यान अनेक फसवणुकी (Fraud) च्या घटनाही समोर आल्या आहेत.

अनेक राज्यांमध्ये असे शेतकरी या योजनेचा लाभ घेतात, जे पात्र नाहीत, तेही याचा लाभ घेत आहेत. सरकारी नोकरी (Government jobs) किंवा व्यवसाय (Business) करणाऱ्यांसह अनेक लोक पीएम किसान योजनेसाठी पात्र नाहीत.

अशा परिस्थितीत जर तुम्हीही या लोकांमध्ये आलात तर तुम्हाला रक्कम परत करावी लागेल. पंतप्रधान किसान योजनेंतर्गत चुकीच्या पद्धतीने घेतलेले पैसे परत करण्याची सुविधाही पोर्टलवर देण्यात आली आहे.

यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in वर जावे लागेल. तेथे होमपेजवर तुम्हाला ऑनलाइन रिफंडचा पर्याय मिळेल. याद्वारे तुम्ही घेतलेले पैसे परत पाठवू शकता.