pm kisan samman nidhi yojana
pm kisan samman nidhi yojana

देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान आणि आर्थिक स्थिती (Financial status) सुधारण्यासाठी केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान किसान योजना (Prime Minister Kisan Yojana) चालवली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चौथ्या महिन्यात प्रत्येकी दोन हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. सन 2019 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हप्ते देण्यात आले आहेत.

पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता एप्रिल महिन्यातील कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही, ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी. शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. नवीन माहितीनुसार आता ही प्रक्रिया 22 मे 2022 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते.

ई-केवायसी पूर्ण करण्यासोबतच सरकारने आता या योजनेसाठी रेशनकार्ड क्रमांक (Ration card number) देणे बंधनकारक केले आहे. यासोबतच शिधापत्रिकेची पीडीएफ प्रत तयार करून ती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे.

याप्रमाणे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा –

– https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– आता किसान कॉर्नर पर्यायावर eKYC लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
– तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
– विनंती केलेली आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
– तुम्ही सबमिट वर क्लिक केल्यानंतर, प्रक्रिया पूर्ण होईल.

याप्रमाणे तुमची स्थिती तपासा –

– सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
– आता ‘फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner)’ या पर्यायावर क्लिक करा.
– त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
– आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.
– त्यानंतर ‘Get Report’ पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.
– शेतकरी, या यादीत तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची रक्कम 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली होती. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना वर्षाच्या पहिल्या हप्त्याचे पैसे 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान दिले जातात, तर दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान मिळतात. तर, योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातात.