Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3 हजार रुपये, करावं लागणार हे छोटंसं काम, वाचा सविस्तर

0

Pm Kisan Mandhan Yojana : केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतीप्रधान देशाचा बळीराजा हा कणा असतो. भारत देखील एक शेतीप्रधान देश आहे आणि देशातील शेतकरी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने विविध योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसान मानधन योजना या 2 योजनेचा देखील समावेश होतो.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात दर चार महिन्यांनी 2,000 चा एक हप्ता याप्रमाणे टाकले जात आहे. पीएम किसान मानधन योजना देखील अशीच एक योजना आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जातात. ही एक पेन्शन योजना आहे. ज्याप्रमाणे सरकारी नोकरदारांना रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील वृद्धापकाळात आर्थिक सहायता देण्यासाठी ही पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

पण ही एक ऐच्छिक योजना आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीला काही पैसे गुंतवावे लागतात आणि यानंतर मग या योजनेअंतर्गत पेन्शन मिळते. दरम्यान आता आपण या योजनेचे संपूर्ण स्वरूप थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काय आहे पीएम किसान मानधन योजना?

या योजनेसाठी 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी पात्र राहतात. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र वयोगटानुसार 55 रुपयांपासून ते दोनशे रुपये प्रति महिन्यापर्यंत गुंतवणूक करावी लागते. ज्या शेतकऱ्यांचे वय 18 वर्षे एवढे आहे त्यांना या योजनेअंतर्गत दरमहिना 3000 रुपये एवढे पेन्शन मिळवण्यासाठी 55 रुपये प्रतिमहीना एवढी गुंतवणूक करावी लागते.

तसेच ज्या शेतकऱ्यांचे वय 40 वर्षे एवढे आहे त्या शेतकऱ्यांना दोनशे रुपये प्रति महिना एवढी गुंतवणूक करावी लागते.या योजनेअंतर्गत जे शेतकरी साठ वर्षांपर्यंत गुंतवणूक करतात त्यांना साठ वर्षे कम्प्लीट झाल्यानंतर दर महिना तीन हजार रुपये एवढी पेन्शन मिळते. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 36 हजार रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना मिळते.

योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात 

ज्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे अशा शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे, जे आधार कार्डशी जोडलेले असावे.

याशिवाय पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, वयाचा दाखला, सातबारा उतारा, 8अ उतारा अशी कागदपत्रेही लागतात. या योजनेंतर्गत 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. यामुळे वृद्धापकाळात शेतकऱ्यांना दिलासा मिळतो.

कसा करणार अर्ज

पीएम किसान मानधन योजनेसाठी तुमच्या जवळील सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज करता येऊ शकतो. किंवा इच्छुक शेतकरी स्वतः देखील यासाठी अर्ज करू शकता. पी एम किसान मानधन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासाठी अर्ज करता येतो. अर्ज सादर करताना योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात.