मुंबई : जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन सध्या न्यूझीलंडमध्ये आहे, जिथे ती महिला विश्वचषक 2022 मध्ये अँकरची भूमिका निभावत आहे. तर जसप्रीत बुमराह सध्या मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंसोबत बायो बबलमध्ये आहे.

जसप्रीत बुमराहची पत्नी न्यूझीलंडमधून विश्वचषक संपल्यानंतरच भारतात परतेल. यानंतर, ती तिच्या पतीसोबत मुंबई इंडियन्सच्या कॅम्प मध्ये सामील होईल. संजना सध्या न्यूझीलंडमध्ये असल्यामुळे जसप्रीत बुमराह तिला मिस करत आहे आणि म्हणूनच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

जसप्रीत बुमराहने पत्नी संजना गणेशनसोबतचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले, “प्लिज लवकर परत ये” बुमराहने शेअर केलेली हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

जसप्रीत बुमराह सध्या मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये आहे, जिथे संघ (मुंबई इंडियन्स) सराव करत आहे. बायो-बबलमध्ये रोहित शर्माची पत्नी त्याच्यासोबत आहे. इतर खेळाडूंचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत आहेत. तर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना सध्या न्यूझीलंडमध्ये आहे.