ramij raja
'Players will now play PSL, not IPL', claims Ramiz Raja; Read their master plan

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष रमीझ राजा यांनी पीएसएल बाबत एक मोठं वक्त्यव्य केले आहे. पाकिस्तान सुपर लीगममध्ये काही बदल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ज्याच्या आधारावर त्यांना आयपीएलला मागे सोडायचे आहे. रमीझ राजा यांना पीएसएलमधील मसुदा प्रणाली बदलून लिलाव पद्धत सुरू करायची आहे, ज्यामुळे पाकिस्तानमधील अर्थव्यवस्था वाढेल.

जागतिक क्रिकेटमध्ये देशाची प्रतिष्ठा आणि कमाई दोन्ही वाढवण्यात पीएसएल महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा विश्वास पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी व्यक्त केला. यासोबतच जर सर्व काही रमीज राजा यांच्या योजनेनुसार घडले तर भविष्यात ही लीग आयपीएललाही टक्कर देईल असे म्हंटले आहे.

कराची नॅशनल स्टेडियममध्ये मीडियाशी बोलताना रमीझ राजा म्हणाले, ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी आम्हाला नवीन मालमत्ता उभारण्याची गरज आहे. आमच्याकडे सध्या पीएसएल आणि आयसीसी निधीशिवाय काहीही नाही. पीएसएलचे पुढील वर्षीचे मॉडेल वादात आहे, मला ते पुढील वर्षीपासून लिलावाच्या मॉडेलमध्ये बदलायचे आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “आम्ही फ्रँचायझींच्या मालकांशी बोलू. हा पैशाचा खेळ आहे. जेव्हा पाकिस्तानमधील क्रिकेटची अर्थव्यवस्था वाढेल तेव्हा आमचा सन्मानही वाढेल. पीएसएलमध्ये लिलाव मॉडेल आणू, मग आम्ही पीएसएल आयपीएलसोबत ठेवू आणि मग पाहू कोण पीएसएलवर सोडून आयपीएल खेळेल.

जगातील सर्वात प्रसिद्ध टी-20 लीग आयपीएलमध्ये लिलाव प्रणाली लागू आहे आणि आता रमीझ राजा यांना देखील हा फॉर्म्युला वापरून आयपीएलला मागे सोडायचे आहे.