petrol
petrol

देशात दीर्घकाळापासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच देशाची राजधानी दिल्लीत आज (मंगळवार) म्हणजेच 22 मार्च 2022 रोजी पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटरवरून 96.21 पर्यंत वाढली आहे. तर डिझेल 86.67 रुपयांनी महाग होऊन आता 87.47 रुपयांवर पोहोचले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट तेलाची किंमत प्रतिबॅरल १०० डॉलरवर घसरली असताना राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) तणावानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 130 डॉलरच्या पुढे गेली होती, त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नव्हती.

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 मार्च 2022 रोजी पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.98 रुपये वरून 110.82 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेलची किंमत 95 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे, जी 4 महिन्यांहून अधिक काळ 94.14 रुपये प्रति लिटरने विकली जात होती.

महानगरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर –

1.दिल्ली (Delhi)
पेट्रोल – 96.21 रुपये प्रति लिटर
डिझेल – 87.47 रुपये प्रति लिटर

2.मुंबई (Mumbai)
पेट्रोल – 110.82 रुपये प्रति लिटर
डिझेल – 95.00 रुपये प्रति लिटर

3.चेन्नई (Chennai)
पेट्रोल – 102.16 रुपये प्रति लिटर
डिझेल – 92.19 रुपये प्रति लिटर

4.कोलकाता (Kolkata)
पेट्रोल – 105.51 रुपये प्रति लिटर
डिझेल – 90.62 रुपये प्रति लिटर

राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावरील व्हॅटच्या वेगवेगळ्या दरांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. केंद्र सरकारने 03 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर होत्या. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा –
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

तेलाच्या किमती दररोज अपडेट केल्या जातात –
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. तसेच नोव्हेंबरपासून भारतातील किमती स्थिर आहेत.