मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांचे काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले होते. सुष्मिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. तेव्हापासून सुष्मीता सतत चर्चेत पाहायला मिळत आहे. त्याचवेळी आता सुष्मिता आणि रोहमन एकत्र फिरताना दिसले आहेत. यामुळे या दोघांचा पॅचअप झाला का? असे प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून विचारले जात आहेत.

काल रात्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल रेस्टॉरंटमध्ये गेले होते. सुष्मितासोबत तिची मुलगी अलिशाही होती. यावेळी यांना रेस्टॉरंटमधून एकत्र बाहेर येताना पाहिल्यावर मीडिया फोटोग्राफर्सने त्यांना घेरले. यावेळीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल रेस्टॉरंटमधून बाहेर पडतात तेव्हा बाहेर चाहत्यांची आणि पापाराझींची गर्दी पाहून ते आश्चर्यचकित होतात. सुष्मिता पापाराझीकडे हाय दाखवून पुढे सरकते आणि मग ती चाहत्यांसोबत सेल्फी काढते. तर दुसरीकडे रोहमन यावेळी सुष्मिताचे संरक्षण करताना दिसत आहे. सुष्मिता आणि रोहमनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे दोघांचा पॅचअप झाल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे नाते 2018 मध्ये सुरू झाले होते. सुष्मित रोहमन वयात 15 वर्षांचा फरक असून सुष्मित रोहमनपेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. पण असे असूनही त्यांच्या नात्यात कधीच अडचण आली नाही. मात्र, डिसेंबर 2021 मध्ये सुष्मिता सेनने एक पोस्ट शेअर करून त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली होती. या बातमीने चाहत्यांना तर धक्काच बसला होता. परंतु हे कपल वेगळे झाले असले तरी अनेक ठिकाणी एका मैत्रीच्या नात्याने एकत्र जातात.