मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. दरम्यान, आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक अभिषेक अग्रवाल आणि विवेक अग्निहोत्री यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अभिषेक अग्रवाल आणि विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत अभिनेत्री पल्लवी जोशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला आली होती. कृतज्ञता व्यक्त करत अभिषेक यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला. पंतप्रधानांसोबतच्या भेटीचे काही फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
फोटो शेअर करताना अभिषेक अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आनंद झाला. ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल त्यांनी केलेले कौतुक आणि त्यांचे विचार या भेटीला आणखीनच खास बनवतात. चित्रपट निर्मितीचा इतका अभिमान आम्हाला कधीच वाटला नाही. धन्यवाद मोदीजी.”