babr
Pakistan's Babar Azam breaks Sachin Tendulkar's record

मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज बाबर आझमची बॅट सध्या जोरात सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत या फलंदाजाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सलग दोन शतके झळकावण्याबरोबरच आयसीसी क्रमवारीत आपली जागा आणखी मजबूत केली आहे. सर्वकालीन क्रमवारीत बाबरने सर्वोच्च रेटिंग गुण मिळवून महान सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.

मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत बाबरने जबरदस्त धावा केल्या. कसोटी मालिकेत त्याच्या बॅटमधून दुसऱ्या कसोटीतील 196 धावांसह एकूण 390 धावा झाल्या. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बाबरने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये सलग शतके झळकावत मालिकेत संघाच्या 2-1 ने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीच्या जोरावर बाबरने आयसीसी क्रमवारीत आपले स्थान आणखी मजबूत केले.

बाबरने आता ICC फलंदाजी क्रमवारीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिनला मागे टाकले आहे. या यादीत मास्टर 887 गुणांसह 15 व्या क्रमांकावर होता. बाबरने 891 गुण घेत त्याला पिछाडीवर टाकत या स्थानावर मजल मारली आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज विव्ह रिचर्ड्स पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 935 गुण मिळवण्याचा विक्रम आहे.

पाकिस्तानचा झहीर अब्बास 931 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ग्रेग चॅपेल 921गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा डेव्हिड गोवर आहे, ज्याच्या नावावर 919 गुण होते. या यादीत डीन जोन्सने 918 गुणांसह पाचवे स्थान पटकावले होते. भारताचा फलंदाज विराट कोहलीने 911 गुणांसह सहावे स्थान पटकावले आहे.