smith
PAK vs AUS: Steve Smith's world record, the world's first cricketer to do so

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान एक खास विश्वविक्रम केला. स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या आणि हा आकडा गाठणारा तो सर्वात वेगवान खेळाडू ठरला आहे.

स्मिथने 8000 कसोटी धावा केवळ 151 डावात पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता, ज्याने 152 कसोटी डावांमध्ये 8000 धावा पूर्ण केल्या होत्या. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर 154 डावांसह तिसर्‍या आणि सर गॅरी सोबर्स 157 डावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

स्मिथ हा पहिला खेळाडू आहे, ज्याने 60 च्या सरासरीने 8000 कसोटी धावा केल्या आहेत. स्मिथने हा आकडा स्पर्श केला तेव्हा त्याची सरासरी 60.1होती. कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा करणारा स्मिथ ऑस्ट्रेलियाचा सातवा खेळाडू आहे. त्याच्या आधी रिकी पाँटिंग (13378 धावा), अॅलन बॉर्डर (11174), स्टीव्ह वॉ (10927 धावा), मायकेल क्लार्क (8643 धावा), मॅथ्यू हेडन (8625 धावा) आणि मार्क वॉ (8029 धावा) यांनी ऑस्ट्रेलियासाठी हा पराक्रम केला होता. .