मुंबई : नुकतेच ऑस्करच्या 94व्या अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा सध्या चांगलाच गाजला आहे. त्याचे कारण म्हणजे या सोहळ्याचे निवेदन करणारा कॉमेडियन ख्रिस रॉक याला अभिनेता विल स्मिथने मंचावर जाऊन कानशिलात मारल्यामुळे. या घडलेल्या घटनेवर गेली दोन दिवस झाले अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिनेही या प्रकरणात आपली प्रतिक्रिया देत विल स्मिथ पाठिंबा दिला आहे.

यासंदर्भात आपलं मत मांडताना कंगणाने इन्स्टाग्रामवर विल स्मिथ आणि क्रिस रॉक यांचा फोटो स्टोरीत शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘जर एखादा मूर्ख माणूस लोकांना हसवण्यासाठी माझ्या आई किंवा बहिणीबद्दल अशी चेष्टा करत असेल, तर मी देखील तेच करेन जे स्मिथनं केलंय.’ असं कंगना म्हणाली.

दरम्यान, काल सोहळ्यात विल स्मिथला यावर्षी ‘किंग रिचर्ड’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यावेळी क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. त्यावेळी त्याने विल स्मिथच्या पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर विल स्मिथ हे आवडले नसल्याने स्टेजवर जाऊन त्याने त्याला कानाखाली मारल्याचं दिसून आलं. मात्र, आज विलने एक पोस्ट शेअर करत यावर क्रिस रॉकची माफी मागितली आहे.