Oppo Series : (Oppo Series) दमदार कॅमेरा आणि अन्य जबरदस्त फीचर्ससह ओपोची Oppo F21s Pro series लवकर लॉन्च होणार आहे. 15 सप्टेंबरला ओपोची ही सिरीज लॉन्च होणार असून, जाणून घ्या या सीरिजचे सर्व फीचर्स.

स्मार्टफोन ब्रँड Oppo ने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज Oppo F21s Pro सिरीज सादर करण्याची तयारी केली आहे. ही मालिका भारतात 15 सप्टेंबरला लाँच होणार आहे. सीरीज अंतर्गत, Oppo F21s (Oppo F21s) आणि Oppo F21s Pro(Oppo F21s Pro) फोन लॉन्च केले जातील.

नवीन सीरीजबद्दल कंपनीने दावा केला आहे की यामध्ये 30x झूम सपोर्ट दिला जाईल. तसेच, दोन्ही फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम + 128 GB स्टोरेज दिले जाईल.

कंपनीने यावर्षी एप्रिलमध्ये Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro 5G भारतात सादर केले होते. आता कंपनीने Oppo F21s Pro सीरीज सादर केली आहे.

Oppo F21s Pro सिरीज तपशील

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर Oppo F21s Pro मध्ये 64MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, जो LED फ्लॅश सह येऊ शकतो. यासोबत फोनमध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळू शकतो.

या फोनमध्ये ऑर्बिट लाईट फीचर दिले जाऊ शकते. या फोनच्या मागील बाजूस Oppo चे ग्लो डिझाइन देण्यात आले आहे. यासोबतच हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जाऊ शकतो, ज्यामध्ये डॉनलाइट गोल्ड आणि स्टारलाईट ब्लॅक समाविष्ट असेल.

Oppo F21s Pro च्या डाव्या बाजूला व्हॉल्यूम रॉकर्स आणि सिम ट्रे आढळतात. त्याच्या उजव्या बाजूला पॉवर बटण दिले आहे. तसेच, यात USB Type-C पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक, स्पीकर ग्रिल आणि एक मायक्रोफोन आहे.

या फोनच्या स्क्रीनच्या वरच्या-डाव्या कोपऱ्यात एक पंच-होल कटआउट आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. इतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिले जाऊ शकते.

याशिवाय, फोन स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. तसेच, Oppo F21s Pro Android 12 आधारित ColorOS 12 सह ऑफर केला जाऊ शकतो.