मुंबई : बॉलिवूडचा सर्वात रोमॅंटिक अभिनेता इमरान हाश्मी याचा आज वाढदिवस आहे. आज तो 43 वर्षाचा झाला आहे. इमरानने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याचा प्रत्येक चित्रपटात आपल्याला रोमांसचा तडका पाहायला मिळतो. आज वाढदिवसानिमित्ताने आपण इमरान हाश्मीने आतापर्यंत केलेल्या काही खास अभिनेत्रींसोबतच्या किसिंग सिनबद्दल जाणून घेणार आहोत की हे सिन प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस पडले होते.
1)मल्लिका शेरावत
या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे ‘मर्डर’. मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मीचे या चित्रपटातील सीन्स अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. या चित्रपटाने त्या काळी एक वेगळाच धुमाकूळ घातला होता.
2)ईशा गुप्ता
ईशा गुप्ता आणि इमरान यांचा ‘राज 3’ हा चित्रपटही खूप चर्चेत होता. यातील ईशा-इमरानचे इंटिमेंट सिन खूपच चर्चेत होते. या चित्रपटातील दृश्यांनी बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
3)बिपाशा बसू
इमरान आणि बिपाशा बसू या जोडीने एकेकाळी मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातलेला. या दोघांचे किसिंग सीन्स जरा जास्तच बोल्ड असल्यामुळे चाहत्यांना खूप आवडले होते.
4)नेहा धुपिया
नेहा धुपियाने इमरानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण या दोघांच्या जोडीने ‘रश’ या चित्रपटाद्वारे पडद्यावर जणूकाही चमत्कारच घडवला. यातील दोघांच्या रोमांसने पडद्यावर आग लावायचे काम केले होते.
5)विद्या बालन
विद्या बालने इमरान हाश्मीसोबत ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटात बोल्डनेसच्च सर्व मर्यादाच ओलांडल्या होत्या. दोघांच्या इंटमेंट सिनमुळे चित्रपट त्याकाळी सुपरहिट ठरला होता.
6)सोहा अली खान
एवढंच नव्हे तर सोहा अली खान आणि इमरान यांनी ‘तुम मिले’ या चित्रपटात दिलेल्या रोमॅंटीक सीन्समुळे तर धमाल केली होती. या चित्रपटात घडलेल्या गोष्टींमुळे सोहाला नेटकाऱ्यांनि ट्रोल केलं होतं.
7)तनुश्री दत्ता
या यादीत पुढचं नाव येत ते ‘आशिक बनाया’ चित्रपटातील अभिनेत्री तनुश्री दत्ताचे. तनुश्री आणि इमरान यांची केमिस्ट्री पहिल्यापासून एकदम धमाल करत आहे आणि त्याकाळी आलेल्या या सिनेमात तर एवढे इंटिमेंट सिन होते की प्रेक्षक आजपर्यंत हा चित्रपट विसरू शकले नाहीत.
इमरान हाश्मीने अभिनेत्रींसोबत दिलेल्या इंटिमेंट सीन्समध्ये या अभिनेत्रींचे नाव जास्त चर्चेत आले होते. हे चित्रपटही प्रेक्षकांमध्ये स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण करून गेले आहेत. तर मंग मित्रांनो या यादीतील तुम्हाला इमरान हाश्मीचा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडला होता हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.