कांदा पिक लागवडीला आणि काढणीला खूप प्रमाणात मजुरांची आवश्यकता आसते. सध्या कांदा पिकांची काढणी सुरू झाली आहे. तर कांदा काढणी साठी लागणाऱ्या मजुरांच्या टंचाई मुळे कांदा काढणीस उशीर होत आहे.

कांदा काढणीनंतर कांद्याची मुळे व पात ही कापावी लागते. पण मजूरटंचाई मुळे कांदा लागवड आणि कांदा काढणीत विलंब होत असल्यामुळे त्याचा परिणाम निघणाऱ्या उत्पादनावर होत आसतो.आणि मजुरांचे काम देखील खूप खर्चिक असते.

यावर मात करण्यासाठी पुणे येथील प्रसन्न परदेशी यांनी कांदा कापणी सयंत्र विकसित केले आहे.या यंत्राला मोटार आणि बॅटरी तसेच ब्लेड यांच्या साहाय्याने विकसित केले आहे. हे यंत्र अगदी सहजतेने हाताळता येते.

या यंत्राचे फायदे

1.कांदा काढणीसाठी एक एकरात जवळजवळ सहा हजाराच्या पुढे मजुरी लागते. या यंत्रामुळे खर्चात बचत होते

2. हे यंत्र केवळ तीन हजारा भेटते त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या काढणी खर्चात बचत होते.

3. मजुरांच्या तुलनेत हे कमी वेळात जास्त काम करते म्हणून वेळेची ही बचत होते.

4.या यंत्रामध्ये ब्लेड दोन्ही बाजूस आसल्यामुळे कांदापात कापण्याचे काम दोन्ही बाजूने करता येते.त्यामुळे कमी अवधीत दोन व्यक्तींच्या मदतीने कांदा पात,मुळी कापता येते.

या यंत्राची वैशिष्ट्ये 1.या यंत्रामध्ये बारा व्होल्टची लीड अॅसिड बॅटरी वापरली आहे. तसेच हाय स्पीड मोटर देखील जोडलेली आहे.

2.या यंत्रामध्ये स्टीलच्या टॉप आणि ब्लेड यांचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून ओली पात कापताना तिच्या ओलसरपणामुळे गंज येऊ नये.

3.एकदा चार्जिंग केली तर आठ तास अगदी आरामात काम करते.

4..वीज उपलब्ध असेल तर एसी ते डीसी कन्वर्टर चा पर्याय उपलब्ध आहे.

5.यंत्राच्या वापराला तुम्ही ट्रॅक्टरची बॅटरी देखील वापरू शकतात. या माध्यमातून एकापेक्षा अधिक यंत्रे अधिक काळासाठी वापरता येतात.

6.बऱ्याच शेतकऱ्यांकडे बॅटरीवर चालणारे फवारणी यंत्र असते. असे शेतकरी या बॅटरीचा उपयोग हे यंत्र चालवण्यासाठी करू शकतात.