सध्या उन्हाळी कांद्याची काढणी झाली असून शेतकरी शेतातील कांदा थेट बाजारत विकण्यासाठी आणत आहे.पण मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे पुढील 5 दिवस बाजार समित्यांमधील  कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.व बाजार समित्या चालू झाल्यानंतर कांद्याचे भाव हे काय असणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बाजार समित्यांमध्ये कांद्याची वाढती आवक यामुळे कांद्याचे दर घटले आहेत. कांदा हा नाशवंत असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा तो थेट बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन येत आहे.

पण सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे लासलगाव व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितसह जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमधील लिलाव बंद राहणार आहेत.

तर कांद्याबरोबरच धान्याचेही व्यवहार बंद असल्याने बाजार समितीत होणारी कोट्यावधींची उलाढाल ही ठप्प राहणार आहे. कांद्याचे भाव हे गेल्या काही दिवसांपुर्वी 3 हजार रुपये क्विंटल होते.

पण आता मात्र हेच कांद्याचे भाव थेट 1 हजार रुपयांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजार समित्या चालू झाल्यावर दरात वाढ होणार की आणखीन घट असे चित्र सध्या कांद्याचे झाले आहे.