
मुंबई : राम नवमी हा सण आज देशभरात साजरा केला जात आहे. भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा होणारा हा सण ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अजूनच खास बनवला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास भगवान रामाची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘बाहुबली’च्या राम अवताराची एक झलक शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर चाहते प्रभासचे भरभरून कौतुक करत आहेत.
चाहते सोशल मीडियावर प्रभासच्या ‘आदिपुरुष’मधील ‘राम’ या व्यक्तिरेखेबद्दलचे फोटोशॉप केलेले फोटो शेअर करत होते, मात्र आता रामनवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी प्रभासचा फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो राम अवतारात दिसत आहे.
ओम राऊत यांनी आज त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रभासच्या चाहत्यांनी बनवलेल्या चित्रपटाशी संबंधित त्याचे वेगळे लूक्स दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला ओम राऊतने चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांनी लावल्याचे व्हिडिओमध्ये लिहिले आहे.
व्हिडिओ शेअर करताना ओम राऊत यांनी ट्विट केले आणि लिहिले, “उफनता वीरता का सागर, छलकती वात्सल्य की गागर। जन्म हुआ प्रभु श्रीराम का, झूमें नाचे हर जन घर नगर!”
उफनता वीरता का सागर,
छलकती वात्सल्य की गागर।
जन्म हुआ प्रभु श्रीराम का,
झूमें नाचे हर जन घर नगर।।Celebrating the victory of good over evil✨#ramnavmi #adipurush pic.twitter.com/Xbl1kOgZ7z
— Om Raut (@omraut) April 10, 2022
प्रभासचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. यावर नेटकरी भरभरून कमेंट करत आहेत. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पुढील वर्षी 12 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट आधी आमिर खानचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटासोबत प्रदर्शित होणार होता, पण त्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.