मुंबई : इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांच्या जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यातच बॉलीवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान तर कायम जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा देत असले. दरम्यान, तिने असाच एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. ज्यात चक्क सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या या फोतीची जोरदार चर्चा होत आहे.

फराह खानने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करण जोहर, शाहरुख खान, फराह खान, अनिल कपूर आणि सलमान खान हे मोठे स्टार दिसत असून हे सर्वजण एकत्र नाचताना दिसत आहेत. फराहची ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली आहे. चाहत्यांनी पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पडला आहे. दरम्यान, फराह खानने शेअर केलेला हा फोटो संजय कपूर आणि त्यांची पत्नी महीप कपूर यांच्या संगीताचा होता. जेव्हा सर्व स्टार्स एकाच छताखाली नाचताना दिसत आहेत.

संजय कपूर आणि महीप कपूर यांचा विवाह 1998 साली झाला होता. दोघांनाही दोन मुले आहेत. तसेच, संजय कपूरची मुलगी शनाया लवकरच ‘बेहडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील तीचा फर्स्ट लूकही शेअर करण्यात आला आहे.