Ola Electric Bike : ओला इलेक्ट्रिक, भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमधील सर्वात मोठ्या खेळाडूंपैकी एक आहे. ओला लवकरच नवीन पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच ओला आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल सादर करणार असल्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च करण्याचा प्लॅन
ओला(Ola)इलेक्ट्रिक लवकरच इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करण्याचा विचार करत आहे. अहवालावर विश्वास ठेवला तर ओला इलेक्ट्रिक कारच्या आधी ही कार सादर केली जाऊ शकते. या लॉन्चद्वारे कंपनीला इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्येही प्रवेश करायचा आहे.
कधी सादर करता येईल?
काही दिवसांपूर्वी ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर S1 Air लाँचच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी सांगितले की त्यांची कंपनी इलेक्ट्रिक मोटरसायकलवर (Ola Electric Bike) काम करत आहे. पुढच्या वर्षी लॉन्च होणार आहे आणि पुढच्या वर्षीच्या होळीपर्यंत ते उघड होईल.
या इलेक्ट्रिक मोटरसायकलबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत ती ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढे असेल हे निश्चित. तसेच, त्यांच्यापेक्षा जास्त खर्च येईल.