salman khan
Now Salman Khan will get involved in new case!

मुंबई : सलमान खान हा बॉलिवूडचा असा अभिनेता आहे ज्याचे न्यायालयाशी असलेले नाते थोडे जुने झाले आहे. आता सलमान खान अतिक्रमणाच्या प्रकरणात अडकल्याचे दिसत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा शेजारी केतन कक्कर याच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिमा खराब केल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल केला होता, ज्यामध्ये कोर्टाने अभिनेत्याची अंतरिम याचिका फेटाळली होती. आणि शेजारी केतन कक्करकडे त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट केले आहे.

सलमान खानचा शेजारी केतन कक्कर हा एनआरआय आहे आणि तो सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसजवळ राहतो. केतनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सलमान खानवर निशाणा साधला होता, त्यानंतर अभिनेत्याने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

मात्र, आता मुंबईतील न्यायालयाने केतन कक्करकडे असलेले पुरावे योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. कोर्टाने सांगितल्यानंतर सलमानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणावर अभिनेत्याच्या वकिलाचे म्हणणे आहे की, “केतन कक्करने सलमान खानच्या फार्महाऊसशेजारी जमीन घेण्याचा प्रयत्न केला. जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर असल्याने वेळोवेळी रद्द करण्यात आला. या प्रकरणानंतरच केतन कक्करने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर खोटे आरोप करण्यास सुरुवात केली.”

Salman Khan, Salman Khan News, Salman Khan interim plea rejected, Sessions court in Mumbai rejected actor Salman Khan interim plea, gag order defamation Case, Salman Khan NRI neighbour Ketan Kakkar, सलमान खान, सलमान खान का पड़ोसी, केतन कक्कड़, मानहानि का केस, सलमान खान अतिक्रमण का मामला

दुसरीकडे, केतनच्या वकिलाचा दावा आहे की, 1996 मध्ये त्यांनी ही जमीन घेतली होती, कारण निवृत्तीनंतर केतनला इथेच राहायचे होते, मात्र 7-8 वर्षांपासून सलमान आणि त्याचे कुटुंबीय केतनच्या जमिनीवर त्यांचा हक्क राखून आहेत.