मुंबई : प्रविण तरडे यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’ संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

नुकतंच प्रविण तरडे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये प्रविण तरडे एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. ‘परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट’, असे या पोस्टरवर त्यांनी कॅप्शन लिहिले आहे.

तसेच, ‘आता आपण फक्त दिवस मोजायचे.. ७५ राहिले!’ असे म्हणतं प्रवीण तरडेंनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसेनापती हंबीरराव हा २७ मे २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.