NOKIA :(NOKIA) स्टाइलिश डिजाइन आणि बॅटरी बॅकअपसह नोकियाचा Nokia X30 (Nokia X30) हा वॉटरप्रूफ फोन लॉन्च झाला आहे. जाणून घ्या या फोनचे सर्व फीचर्स.

Nokia X30 5G स्पेसिफिकेशन 

Nokia X30 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला असून यात तीन हाय-रिझोल्युशन कॅमेरे आहेत. X30 5G ची 6.43-इंच AMOLED स्क्रीन 90Hz रिफ्रेश दर देते. या फोनचे वजन सुमारे 185 ग्रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये 4,200mAh बॅटरी आहे, जी USB 3.0 द्वारे 33W वर चार्ज केली जाऊ शकते.

Nokia X30 5G वॉटरप्रूफ आहे

Nokia X30 5G (5G) च्या डिस्प्लेमध्ये 1080p रिझोल्यूशन आहे आणि ते कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसद्वारे संरक्षित आहे. हा स्मार्टफोन पाण्याखालीही (Waterproof) सुरक्षित राहतो, त्यामुळे या स्मार्टफोनला IP67 रेटिंग मिळाली आहे.

Nokia X30 5G कॅमेरा

X30 5G च्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड-एंगल मॉड्यूल समाविष्ट आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन Android 12 सह सादर करण्यात आला आहे.

नोकिया X30 5G किंमत

युरोपमध्ये, X30 5G चा 6GB + 128GB व्हेरिएंट €519 म्हणजे भारतीय रु. 41,405 आणि 8GB + 256GB व्हेरिएंट €549 म्हणजे रु. 43,764 मध्ये ऑफर करण्यात आला आहे. यूकेमध्ये या प्रकारांच्या किमती अनुक्रमे £399 (रु. 36,605) आणि £439 (रु. 40,266) आहेत.