jarshi
New Jersey Poster Release; The movie will be screened on "this" day

मुंबई : शाहिद कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘जर्सी’ मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रतीक्षा जवळपास संपली आहे. या चित्रपटाविषयीच्या उत्साहात भर घालत ‘जर्सी’च्या निर्मात्यांनी आज आणखी एक पोस्टर लाँच केले आहे. ‘कबीर सिंह’ चित्रपट हिट झाल्यानंतर शाहिद ‘जर्सी’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतत आहे.

चित्रपटाचे हे नवीन पोस्टर हृदयाला स्पर्श करणारे आहे, ज्यावर चित्रपटातील खास क्षण दाखवण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये शाहिद कपूरला चार वेगवेगळ्या भूमिकेत दाखवलं आहे. एक निश्चयी क्रिकेटर, एक प्रेमळ पिता, एक प्रेमळ पती आणि एक माणूस जो पुन्हा चमकण्याच्या मार्गावर आहे. पोस्टरमध्ये मृणाल ठाकूर, पंकज कपूर आणि रोनित कामरा देखील दिसत आहेत.

अल्लू एंटरटेनमेंट आणि ब्रॅट फिल्म्स निर्मित, ‘जर्सी’ चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते गौथम तिन्ननुरी यांनी केले आहे, ज्यांनी चित्रपटाच्या मूळ तेलगू आवृत्तीसाठी पुरस्कार जिंकला आहे. त्याचवेळी, शाहिद कपूर देखील या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे, हा चित्रपट खूप पूर्वी प्रदर्शित झाला असता, परंतु कोरोना महामारीमुळे हा चित्रपट दीर्घकाळानंतर चित्रपटगृहात दाखल होण्यास सज्ज झाला आहे.

Jersey, Shahid Kapoor, New poster of Jersey, जर्सी, जर्सी नया पोस्टर, शाहिद कपूर

शाहीदचा हा चित्रपट 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे आणि त्याच दिवशी मोस्ट अवेटेड चित्रपट ‘KGF 2’ प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच यावेळी बॉक्स ऑफिसवर यश आणि शाहिद आमनेसामने येणार आहेत, आता या टक्करयामध्ये कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल, कारण प्रेक्षक दोन्ही चित्रपटांची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.