मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत तिचा पती रितेश सिंहपासून वेगळी झाली आहे. काही काळापूर्वी राखीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याचा खुलासा केला होता. राखीपासून विभक्त होऊनही रितेश राखीबद्दल काही ना काही पोस्ट शेअर करत असतो. आता त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे लोक त्याच्यावर आता संतापले आहेत.

रितेशने आपल्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विशाल मिश्राचे ‘लंबी जुदाई’ गाणे वाजत आहे आणि राखीचे काही फोटो प्ले होताना दिसत आहे. तसेच, व्हिडिओ शेअर करताना रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, “फक्त हे गाणे अनुभवा.” यावर आता यूजर्सनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

रितेश सिंहचा हा व्हिडिओ पाहून यूजर्स त्याला जोरदार ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले, “तुम्हाला प्रसिद्धी मिळत नाही का?” दुसऱ्याने लिहिले, “राखीच्या नावाने जगणे बंद करा, स्वतःची ओळख बनवा. थोडी तरी लाज बाळगा.” अश्या अनेक कमेंट करत नेटकर्यांनी रितेशला ट्रोल केले आहे. दरम्यान, रितेशच्या या पोस्टवर राखी सावंतने अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही.