मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ची खिल्ली उडवली होती. यावरून ट्विंकला नेटकर्यांनी खूप ट्रोल केलं होतं. यातच आता या वादात नेटकऱ्यांनी अक्षय कुमारलाही चांगलंच सुनावलं आहे.
ट्विंकल खन्ना हिने काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या एका कॉलममध्ये याबाबत भाष्य केले होते. यावेळी ट्विंकल खन्नाने विवेक अग्निहोत्रींच्या द कश्मीर फाइल्सवर प्रतिक्रिया देताना त्याची खिल्ली उडवली. ट्विंकल खन्ना म्हणाली, “सध्या अनेक चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्रींसोबत बरोबरी साधण्यासाठी विविध शहरांच्या नावावर चित्रपट बनवत आहे. तसेच या चित्रपटाची नावे रजिस्टर करण्यासाठी या निर्मांत्यांचीही धावपळही सुरु आहे. मी सुद्धा आता ‘नेल फाइल’ नावाचा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे”, असेही म्हणत ट्विंकलने अप्रत्यक्षपणे द कश्मीर फाइल्सची खिल्ली उडवली होती.
यावरून आता नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला सुनावलं आहे. एका युजरनं कमेंट करत लिहिलं की, ‘अक्षय कुमारजी कृपया तुमच्या मूर्ख पत्नीला समजवा नाहीतर एक दिवस तिच्यामुळे तुम्ही रस्त्यावर याल. स्वतः तर फ्लॉप आहेच. काही काम नाही तर घरी बसून ती स्वतःचा मुर्खपणा सर्वांना दाखवून तुम्हाला लवकरच रस्त्यावर आणणार आहे. तिला समजवा.’ अशी टीका या नेटकर्याने ट्विंकलवर केली आहे.
दरम्यान, चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.