मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर सध्या मुलगा रणबीरच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. रणबीर कपूर लवकरच अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
यादरम्यान, नीतू कपूरला तिच्या एंगेजमेंटची आठवण झाली आहे. त्यांच्या लग्नाला 43 वर्षे झाली आहेत. १९७९ साली याच दिवशी नीतूने अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केले होते. या ज्येष्ठ अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ती सध्या चर्चेत आहे. नीतू कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
नीतू कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पती ऋषी कपूरसोबत दिसत आहे. नीतू आणि ऋषी कपूर यांचा हा फोटो एंगेजमेंटचा आहे या फोटोत दोघेही एकमेकांना रिंग घालताना दिसत आहेत.
हा फोटो शेअर करताना नीतू कपूरने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. “बैसाखीच्या दिवसाच्या आठवणी, 43 वर्षांपूर्वी 13 एप्रिल 1979 रोजी लग्न झाले होते.’ नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या एंगेजमेंटचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना त्यांचा हा फोटो खूप आवडला आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत सस्पेन्स आहे. 14, 15 आणि 17 एप्रिल या दोघांच्या लग्नाच्या वेगवेगळ्या तारखा समोर आल्या आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह कपूर कुटुंबाच्या आरके स्टुडिओमध्ये होणार आहे. जिथे तयारी जोरात सुरू आहे. सजावटीचे फोटोही व्हायरल होत आहेत.