hardik pandya
NCA's hanging sword on Hardik Panda, a big blow to Gujarat Titans

मुंबई : आयपीएल 2022, 26 मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. यावर्षी आयपीएल 15 मध्ये आठ ऐवजी दहा संघ जेतेपदासाठी भिडताना दिसतील, परंतु त्याआधी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याबद्दल एक मोठे अपडेट समोर येत आहे. ज्यामुळे संघाच्या अडचणी वाढू शकतात.

आयपीएलची नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्सने भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आपल्या संघाची कमान सोपवली आहे. मात्र, हा खेळाडू बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. 2021 च्या विश्वचषकानंतर हार्दिकने त्याच्या फिटनेसमुळे भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. यामुळे हा खेळाडू आयपीएलपूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये पोहोचला आहे आणि तिथून त्याच्या फिटनेसचे शेवटचे अपडेट समोर येईल. जर हार्दिक NCA मधील फिटनेस चाचणी पास करू शकला नाही तर तो संपूर्ण IPL हंगामाला मुकू शकतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने हार्दिकबाबत बोलताना सांगितले की, “तो पुढील दोन दिवस एनसीएमध्ये असेल आणि त्याच्या विविध फिटनेस चाचण्या होतील. हार्दिक हा केंद्रीय करार असलेला खेळाडू आहे आणि UAE मध्ये झालेल्या टी-20 कपपासून त्याने कोणतेही क्रिकेट खेळलेले नाही.

ते पुढे म्हणाले, “हार्दिकला फिटनेट चाचणी उत्तीर्ण करावी लागेल कारण आता ते आवश्यक झाले आहे. गेल्या वर्षी श्रेयस अय्यरनेही खांद्याला दुखापत झाल्यानंतर आयपीएल खेळण्यापूर्वी फिटनेस चाचणी दिली होती.”

दरम्यान, हार्दिकला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी तंदुरुस्त मानले जाते, परंतु त्याच्या गोलंदाजीबद्दल अद्याप काहीही सांगितले जाऊ शकत नाही. मात्र, गुजरात टायटन्स संघाने स्पष्ट केले आहे की फ्रँचायझी त्याच्याकडे फक्त एक फलंदाज म्हणून पाहत आहे. गुजरात टायटन्सचा संघ 28 मार्चपासून लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल मोहिमेला सुरुवात करणार आहे.