अखेर नमो शेतकरी योजनेचा श्रीगणेशा झालाच; शिर्डीच्या कार्यक्रमात मोदींनी एक बटन दाबले अन पहिला हफ्त्याचे 2,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले
Namo Shetkari Yojana : शिंदे सरकारने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. यामध्ये एक रुपयात पिक विमा योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन योजनेचा देखील समावेश आहे. यंदाचा हा संपूर्ण अर्थसंकल्प शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून बनवण्यात आला होता.
आगामी निवडणुकीचा काळ पाहता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी विविध योजनांची घोषणा शासनाकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी देखील सुरु झाली जात आहे. खरीप हंगामापासून एक रुपया पिक विमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
नमो शेतकरी योजनेची अंमलबजावणी देखील आजपासून सुरू झाली आहे. कारण की आज या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे. खरंतर नमो शेतकरी योजना ही केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. नमो किसान योजनेअंतर्गत पीएम किसान प्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
दोन हजार रुपयाच्या वार्षिक तीन समान हप्त्यात या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे पीएम किसान अंतर्गत 6000 आणि नमो शेतकरी अंतर्गत 6000 असे एकूण 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. वास्तविक या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात झाली मात्र योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना लवकर मिळत नव्हता. यामुळे ही योजना घोषणापुरतीच मर्यादित आहे की काय असा सवाल उपस्थित होत होता.
पण गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत नमो किसान योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या योजनेच्या पहिल्या हप्त्याला शिंदे सरकारने मंजुरी दिली. यामुळे या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि आज या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
या योजनेचा पहिला हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू करण्यात आली आहे आणि त्यांच्याच हस्ते या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे.
आज 26 ऑक्टोबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे आयोजित एका कार्यक्रमातून रिमोट बटन दाबून राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे दिवाळी सणाच्या पूर्वीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असल्याचे चित्र तयार होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी राज्यातील 95 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 86 लाख 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने यासाठी १७२० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता न केल्याने काही शेतकऱ्यांना या योजनेचा पहिल्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाहीये.
ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाहीये. यामुळे या योजनेचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी केली पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा पहिला हप्ता वितरित झाला आहे. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम सोमवार पर्यंत जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेचा मेसेज पडण्यासाठी सोमवार पर्यंत वाट पहावी सांगितले जात आहे.
एकंदरीत आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ मिळाला असून यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. विशेष बाब अशी की, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच पंधरावा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसानचा 15 वा हप्ता देखील दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.