मुंबई : बॉलीवूडचे लोकप्रिय कपल अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या महिन्याच्या 17 तारखेला लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे इंडस्ट्रीत सध्या फक्त या कपलच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरच्या हटके लवस्टोरीच्या गंमतीशीर गोष्टी व्हायरल होताना दिसत आहे. आलियानं आपल्या भुतकाळातील रिलेशनशिपवरुन काही गोष्टी शेयर केल्या आहेत. ज्यामुळे तर अनेकांना धक्काच बसला आहे.
फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आलियानं रणबीरसोबतच्या रिलेशनशिपच्या काही गोष्टींना उजाळा दिला आहे. त्यामध्ये ती म्हणाली, “मी त्याच्याशी तो कलाकार आहे म्हणून लग्न करत नाही तो माणून म्हणून कसा आहे याचा विचार करुन एकत्र राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी खूप आनंदी आहे. तो एक चांगला व्यक्ती आहे. मात्र त्याच्या तुलनेत मी देखील काही कमी नाही. आमचा एकमेकांशी चांगला संवाद आहे. नातं टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त ते महत्वाचे असते. असे मला वाटते. बऱ्याचदा तो माझ्यापेक्षाही चांगला व्यक्ती आहे.” हे मला जाणवल्याचे आलियानं सांगितलं आहे.
पुढे मुलाखतीत आलियाला रणबीरच्या भुतकाळातील रिलेशनशिपवरुन विचारण्यात आले तेव्हा ति म्हणाली, “त्याचा आता काय उपयोग आणि ते काय जास्त महत्वाचे आहे का, प्रत्येकाचा भुतकाळ असतो. माझाही आहे आणि मी पण काही कमी नाही. त्यामुळे आपण जसे आहे तसे समोरच्याला स्विकारुन पुढे जायचं”, असंही आलियानं मुलाखतीतून स्वताला व्यक्त केलं. आलियाच्या या वक्तव्यानंतर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या की आलियाने असे का म्हंटले? तिने भूतकाळात काय केलं आहे? असे अनेक प्रश्न नेटकरी आलियाला करत आहेत.
दरम्यान, आलिया आणि रणबीर हे अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार आहेत. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक लग्नाला उपस्थित राहणार आहेत आणि या लग्नात फक्त एक किंवा दोन फंक्शन असतील. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी 20 जानेवारी 1980 रोजी आरके हाऊसमध्ये सात फेऱ्या मारल्या आणि आई-वडिलांप्रमाणेच रणबीर कपूरनेही चेंबूरमधील कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये सात फेऱ्या मारणार आहे.