मुंबई : बॉलीवूडमधील दमदार अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन तिच्या खाजगी आणि व्यावहारिक दोन्ही आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मीताने तिच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. या मुलाखतीत सुश्मिताने तिचा मॅनेजर तिला आयटम सॉंग करू देत नसतं. तसेच, तो सुष्मीता वेड समजत असे, असा खुलासा केला आहे.

सुष्मिताने मुलाखतीत सांगितले, “जेव्हा मी 22 वर्षांची होते आणि आयटम सॉंगवर परफॉर्म करू इच्छित होते. तेव्हा माझे मॅनेजर मला नकार देत. इतकंच नाही तर तो मला वेडा समजायचा की मला आयटम नंबरवर काम करायचं आहे. कारण त्यामुळे प्रतिष्ठा नष्ट होते. असं त्याला वाटायचं. मॅनेजर मला सांगायचा आयटम नंबर करणं वाईट वाटतं आहे. तसेच, तो म्हणायचा, तुम्ही या उद्योगात नवीन आहात आणि आम्ही खूप जुने आहोत, त्यामुळे आम्ही तुमच्यापेक्षा जास्त अनुभवी आहोत.”

सुष्मिताने मुलाखतीत पुढे सांगितलं, “माझे दोन व्यवस्थापक होते. ज्यांनी मला वेडी असल्याचे सांगून सोडले होते आणि मी संपूर्ण चित्रपटात काम करावे, अशी त्यांची इच्छा आहे. पण मला म्युझिक व्हिडिओमध्ये काम करायचे होते. चित्रपट फ्लॉप झाला तरी गाण्यावर त्याचा परिणाम होणार नाही, यावर माझा विश्वास होता.” असं सुष्मीता म्हणाली.

दरम्यान, सुष्मीताने अनेक आयटम साँगमध्ये काम करून स्वतःचं नाव कमवलं आहे. तसेच, लोकांनकडून खूप पसंतीही मिळवली आहे. सुष्मिताने ‘जोर’ चित्रपटातील ‘मैं कुडी अंजनी हूं’ आणि ‘फिजा’मधील ‘मेहबूब मेरे’, ‘सिर्फ तुम’मधील ‘दिलबर दिलबर’ यासारख्या हिट गाण्यांमध्ये दमदार परफॉर्मन्स दिला आहे.