
मुंबई : यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला IPL मेगा लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 15.25 कोटींना विकत घेतले आहे. दरम्यान, इशान किशनने गौरव कपूरच्या शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सला हजेरी लावली होती. येथे त्याने आयपीएल, रोहित शर्मा, एमएस धोनीशी संबंधित सर्व प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. यादरम्यान ईशान किशनने आयपीएल लिलावासंबंधित एक किस्सा देखील सांगितला आहे.
आयपीएल लिलावासंबंधित एक किस्सा शेअर करताना ईशान किशन म्हणाला, “त्यावेळी मी खूप चिलआउट होतो, मी तणावात असायला हवे होते. मी माझ्या मित्रांसोबत बाहेर होतो, आम्ही फुटबॉल खेळत होतो. लिलाव संपल्यावर मला मोनू भाईचा फोन आला, त्यांनी मला चांगले पैसे मिळाल्याचे सांगितले. मग मी घरी गेलो तर आई कॉल वर गुंतलेली होती, तिचे गाल लाल झाले होते. मी माझ्या वडिलांना पहिले पण त्यावेळी ते घरी नव्हते, मग मी आईला विचारले बाबा कुठे आहेत? यावर आईने सांगितले की, बीपी तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. हा किस्सा शेअर करताना ईशान किशनच्या चेहऱ्यावर हास्य होते.
ईशान पुढे रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही बोलला, हिटमॅन रोहित शर्माच्या कर्णधारपदावर बोलताना ईशान म्हणाला की, “संपूर्ण सामन्यात रोहित भाईचे मन धावत राहते. इशान म्हणाला की, रोहित सामन्यादरम्यान फक्त एकदाच चिडलेला दिसतो. मात्र, सामन्यानंतर तो म्हणतो सामन्यादरम्यान असे घडते, त्यामुळे कोणीही कोणती गोष्ट मनावर घेऊ नये. पुढे ईशान म्हणाला, रोहित भाई खूप कूल कर्णधार आहे.”
धोनीबाबत बोलताना ईशान म्हणाला, धोनी विकेटकीपिंगपेक्षा जास्त समोरच्या खेळाडूवर लक्ष ठेवतो. धोनीसोबतच्या मॅच दरम्यान, मी कोणत्या तणावाखाली होतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मी चांगला खेळत होतो आणि गोलंदाजांवर जोरदार मारा करत होतो. पण, धोनीने बॉलर इम्रान ताहिरशी बोलले आणि माझ्या मनात विचार सुरू झाला की धोनी भाई त्याच्याशी काय बोलले असेल. त्यानंतर मी ड्राईव्ह मारला आणि स्पिनर शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने बाद झालो.