Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

मशरूम शेती करायची ? ‘या’ 5 जातींची लागवड करा मिळणार अधिकचे उत्पादन, वाचा सविस्तर

0

Mushroom Farming : भारताच्या खाद्य संस्कृतीत गेल्या काही वर्षांमध्ये मशरूमचा समावेश मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. मशरूममध्ये असणारे औषधी गुणधर्म पाहता आता मशरूमची मागणी देखील मोठी वाढली आहे.

हेच कारण आहे की आता देशातील बहुतांशी शेतकरी मशरूमची शेती करू लागले आहेत. आपल्या राज्यातही अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी मशरूम शेतीचा प्रयोग राबवला आहे. विशेष म्हणजे मशरूम शेती मधून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे.

मात्र असे असले तरी मशरूमच्या शेतीतून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर मशरूमच्या सुधारित जातींची शेती करणे आवश्यक असते. अशा स्थितीत आज आपण मशरूमच्या भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या टॉप पाच जातींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मशरूमच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

बटन मशरूम : बटन मशरूम बेबी मशरूम तसेच व्हाईट मशरूम म्हणूनही ओळखले जाते. या जातीचे देशभरात उत्पादन घेतले जाऊ शकते. देशात घेतल्या जाणाऱ्या मशरूमच्या एकूण उत्पादनापैकी 85 टक्के उत्पादन बटन मशरूमचे असते. शिवाय या मशरूमला बाजारात मोठी मागणी आहे. यामुळे या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

ऑईस्टर मशरूम : मशरूमची ही एक सुधारित जात आहे. या जातीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आपल्या राज्यातही या जातीचे मशरूम मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहे. या मशरूमची चव थोडीशी गोड असते. हेच कारण आहे की अनेक लोक या जातीचे मशरूम मोठ्या आवडीने खातात.

परिणामी बाजारात याला देखील मोठी मागणी असते. ऑयस्टर मशरूमचा आणखी एक प्रकार म्हणजे किंग ऑयस्टर मशरूम. हे जाड पांढऱ्या देठावर वाढतात आणि त्यांना कडक मांसल पोत असतो. या मशरूमची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

एनोकी मशरूम : मशरूमची ही देखील एक सुधारित आणि आपल्या देशात उत्पादित होणारी एक प्रमुख जात आहे. या जातीची लागवड करून अनेक शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. भारतीय स्वयंपाकघरात या मशरूमची मोठी मागणी आहे.

हे लांब देठ आणि लहान टोपी असलेले मशरूम आहे. या मशरूमला हिवाळी मशरूम किंवा गोल्डन सुई मशरूम म्हणूनही ओळखले जाते. या मशरूममध्ये विविध औषधीय गुणधर्म आढळतात. म्हणून याला बाजारात मागणी असते आणि या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. 

क्रेमिनी मशरूम : ही देखील मशरूमची एक सुधारित जात आहे. हे मशरूम बटन मशरूमसारखेच भासते. या मशरूमचा रंग तपकिरी, पोत अधिक मजबूत असतो. या मशरूमची चवही खूपच खास आहे. म्हणून यालाही बाजारात चांगली मागणी आहे. या मशरूमला बेबी बेला आणि बेबी पोर्टोबेलो मशरूम म्हणूनही ओळखले जाते.

शिमेजी मशरूम : या मशरूमचे आपल्या देशात कमी उत्पादन घेतले जाते. परंतु मशरूमच्या यादेखील जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. या मशरूमला बीच ब्राऊन मशरूम आणि बुना शिमेजी मशरूम म्हणून ओळखले जाते. समुद्रकिना-यावरील मृत झाडांवर हे मशरूम उगवले जातात.

हे मशरूम मूळ पूर्व आशियातील आहेत परंतु ते उत्तर युरोपमध्ये देखील आढळतात. हे मशरूम कच्चे खाल्ल्यास किंचित कडू भासते. परंतु शिजवल्यानंतर या मशरूमची चव देखील काही औरच असते. म्हणून यालाही बाजारात मागणी राहतेच. याची लागवडही शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते.