Mumbai Weather :(Mumbai Weather) मुंबईमध्ये आजही पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून, मुंबईकरांना आजही पावसाला सामोरे जावे लागणार आहे. IMD ने पावसासंदर्भात अलर्ट जारी केले असून, जाणून घ्या आज कसे राहील वातावरण.

हवामान खात्यानुसार मुंबईसह त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता नाही. मंगळवारीही महानगर मुंबईत दुपारी हलका पाऊस झाला. आज दुपारनंतरही पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मुंबई शहरात ऑक्टोबरमध्ये मान्सून परतेल आणि पुन्हा एकदा पावसाळा सुरू होईल.

आज मुंबईतील हवामान कसे असेल?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत आज, 28 सप्टेंबर, बुधवारी आकाश ढगाळ राहील आणि त्यादरम्यान शहरात रिमझिम किंवा हलका पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी 29 आणि 30 सप्टेंबर रोजीही महानगरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यानंतर, 1 ऑक्टोबर रोजी शहरात ढगाळ वातावरण (weather) राहील आणि हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, मुंबईत 2 आणि 3 ऑक्टोबरला चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तपमानाचा विचार केला तर हवामान खात्यानुसार आज किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत अद्याप मुसळधार पावसाची शक्यता नाही

भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला नाही. यासोबतच IMD ने असेही म्हटले आहे की, या काळात हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस मुंबईला भिजवत राहील. त्याचवेळी 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत मान्सून पुन्हा एकदा परतण्याची शक्यता आहे.