मुंबई ते दिल्लीचा प्रवास होणार सुसाट ! भारतीय रेल्वे लवकरच चालवणार ‘ही’ हाय स्पीड ट्रेन, वाचा सविस्तर
Mumbai To Delhi Railway : मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी म्हणून ओळखली जाते. दरम्यान मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या मार्गावर लवकरच एक हाय स्पीड ट्रेन चालवली जाणार आहे.
खरंतर मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे. या दोन्ही शहरांमधील अंतरही खूप अधिक आहे. पण आता दिल्लीचा प्रवास वेगवान होणार आहे. कारण की, या मार्गावर एक नवीन हाय स्पीड ट्रेन चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय रेल्वेकडून आणखी एक हायस्पीड ट्रेन चालवली जाणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरु झाले आहे. विशेष म्हणजे यापैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
म्हणजेच राजाला आत्तापर्यंत सहा वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. यापैकी चार गाड्या तर मुंबईमधूनच धावत आहेत. मुंबईतील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या चार मार्गांवर ही गाडी सुसाट धावत आहे.
मात्र या गाडीचे तिकीट दर अधिक असल्याचा ओरड गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केला जात आहे. हेच कारण आहे की भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे साधारण ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही एक एसी ट्रेन आहे.
पण वंदे साधारण ट्रेन ही नॉन एसी राहणार आहे. यामुळे या गाडीचे तिकीट दर वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी राहतील असा अंदाज आहे. परंतु वंदे साधारण ट्रेनचा वेग हा 130 किलोमीटर प्रति तास एवढा असेल. यामुळे प्रवाशांना स्वस्तात, जलद गतीचा आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येणार आहे.
दरम्यान वंदे साधारण ट्रेन सुरुवातीच्या टप्प्यात देशातील पाच महत्त्वाच्या मार्गावर चालवली जाणार असे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात मुंबईला देखील वंदे साधारण ट्रेनची भेट मिळणार आहे. मुंबई ते दिल्ली या महत्त्वाच्या मार्गावर ही वंदे साधारण ट्रेन सुरू होणार आहे.
यामुळे मुंबई ते दिल्लीचा प्रवास अधिक जलद सुरक्षित आणि स्वस्तात होणार आहे. ही ट्रेन सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने दिल्ली अब दूर नही है जनाब अस म्हणावं लागणार आहे. मुंबई ते दिल्ली या मार्गासोबतच पटना ते नवी दिल्ली, हावडा ते नवी दिल्ली, हैदराबाद ते नवी दिल्ली आणि एनारकुलम ते गुवाहटी या मार्गावर देखील वंदे साधारण ट्रेन चालवली जाणार आहे.