Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

महत्त्वाची बातमी ! राजधानी मुंबईमध्ये धावणाऱ्या ‘या’ विशेष रेल्वेच्या वेळापत्रकात झाला मोठा बदल, वाचा सविस्तर

0

Mumbai Railway News : मुंबई शहरामध्ये गेल्या काही वर्षात रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. खरंतर गेल्या काही वर्षांपासून शहरातील आणि उपनगरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे.

यामुळे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा म्हणून रस्ते आणि रेल्वे वाहतूक मजबूत केली जात आहे. प्रामुख्याने रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यावर शासनाचा विशेष जोर राहिला आहे.

रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आता विविध मार्गांवर मेट्रो चालवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानुसार विविध मार्गांवर मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. याशिवाय, शहरात वंदे मेट्रो चालवण्याची देखील योजना आखली जात आहे.

तसेच शहरात मोनोरेल देखील सुरू करण्यात आली आहे. मोनोरेलला प्रवाशांनी एवढा प्रतिसाद दाखवलेला नसला तरी देखील ही गाडी शहरातील प्रवाशांसाठी विशेष फायद्याची ठरलेली आहे. या गाडीमुळे शहराचे वैभव वाढले आहे. दरम्यान शहरातील याच मोनोरेल संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

ती म्हणजे आज अर्थातच २३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान मुंबई मोनोरेलच्या वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या वेळापत्रकात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. या कालावधीत मोनोरेलमध्ये तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

यामुळे साहजिकच मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या कालावधीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण या कालावधीत मोनोरेल वेळापत्रकात नेमका काय बदल झाला आहे हे पाहणार आहोत.

वेळापत्रकात काय बदल होणार ?

मोनोरेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीमध्ये अर्थातच 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान वडाळा ते चेंबूर दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा दुपारी २ वाजेपर्यंत खंडीत केली जाणार आहे.

म्हणजे या काळात ही गाडी धावणार नाही. तसेच दुपारी २ नंतर वडाळा ते चेंबूर दरम्यान दर एक तासाच्या अंतराने मोनोरेल सेवा सुरू राहील, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे.

पण वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा नियमित वेळापत्रकानुसार कार्यरत राहणार असल्याने प्रवाशांनी याची देखील नोंद घ्यावी असे रेल्वेने म्हटले आहे. निश्चितच मोनोरेलच्या या बदललेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना थोडा काळ गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

तथापि प्रवाशांनी या बदलेल्या वेळापत्रकानुसारच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन मोनोरेल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार असल्याने मोनोरेल प्रशासनाने प्रवाशांची माफी देखील मागितली आहे.