Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

दक्षिण मुंबई ते नवी मुंबईचा प्रवास होणार फक्त 20 मिनिटात ! केव्हा सुरू होणार ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प ? पहा….

0

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासंदर्भात. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहरात आणि उपनगरात पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले गेले आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी शहरात आणि उपनगरात लोकल ट्रेनची उपलब्धता वाढवण्यात आली आहे. यासोबतच शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. याव्यतिरिक्त रस्ते विकासाची देखील वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली आहेत. भुयारी मार्ग, सागरी पूल, कोस्टल रोड, उड्डाणपूल इत्यादी रस्ते विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत.

या रस्ते विकासाच्या कामात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या प्रकल्पा अंतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान सागरी पूल तयार केला जात आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत विकसित होणारा हा सागरी पूल देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल असल्याचा दावा देखील केला जात आहे. हा पूल जवळपास 21.8 किलोमीटर लांबीचा आहे.

हा समुद्रावर उभारण्यात आलेला सागरी ब्रिज दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी देणार आहे. या प्रकल्पांतर्गत शिवडी येथील मेसंट रोडपासून सुरु होतो जिथे तो इस्टर्न फ्रीवेला जोडलेला आहे आणि नवी मुंबईतील शिवाजीनगर येथे मुख्य भूभागावर संपतो. विशेष म्हणजे पुढे हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक 54 ला ही जोडला जातो.

विशेष बाब अशी की हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबई मधून नवी मुंबई मध्ये फक्त वीस मिनिटात येता येणार आहेत. म्हणजेच दक्षिण मुंबई ते नवी मुंबई चा प्रवास आता भविष्यात फक्त वीस मिनिटांच्या काळात पूर्ण होणार आहे. तसेच या मार्गावर टोल भरण्यासाठी कुठेच थांबावे लागणार नाही. यासाठी ओपन टोलिंग सिस्टम ही आधुनिक प्रणाली वापरली जाणार आहे.

ही प्रणाली आपण आत्तापर्यंत फक्त विदेशातच पाहिली असेल. पण एमटीएचएल प्रकल्पामध्ये ही आधुनिक प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास गतिमान होणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पासाठीचे संचालन आणि देखभालीसाठी जागतिक निविदा मागवल्या आहेत.

यामुळे आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचे चित्र आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये हा प्रकल्प डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा मार्ग खुला होईल असे सांगितले जात आहे. यामुळे आता हा प्रकल्प यावर्षी अखेरपर्यंत सुरू होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.