अखेर मुहूर्त मिळाला ! मुंबई मधील ‘हा’ 11 किलोमीटर लांबीचा मेट्रोमार्ग लवकरच होणार सुरु, कसा असेल रूट, वाचा सविस्तर
Mumbai Metro News : गेल्या काही वर्षांमध्ये नवी मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे वेगाने विकसित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांमुळे मुंबई शहरात अन उपनगरात विविध मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही वेगाने मेट्रो मार्गांचे काम पूर्ण केले जात आहे.
नागपूर मध्ये देखील मेट्रोमार्ग सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांना मेट्रोची भेट मिळाली आहे मात्र नवी मुंबईकरांना अजूनही मेट्रो मार्गाची भेट मिळालेली नाही. विशेष म्हणजे नवी मुंबई शहरातील मेट्रोसाठी 2011 मध्येच पायाभरणी करण्यात आली आहे.
म्हणजे पायाभरणी करून जवळपास बारा वर्षांचा काळ उलटला आहे तरी देखील अजूनही नवी मुंबई शहरात मेट्रो धावलेली नाही. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. पण आता नवी मुंबईकरांची ही नाराजी दूर होणार आहे. कारण की, शहरातील पहिला मेट्रो मार्गे लवकरच सुरू होणार आहे.
विशेष बाब अशी की, या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई शहरातील मेट्रो लाईन एक चे उद्घाटन 30 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. या मार्गाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पांतर्गत बेलापूर ते पेंढारदरम्यान मेट्रो मार्ग विकसित करण्यात आला आहे.
या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 11.1 किलोमीटर एवढी आहे. या मेट्रो मार्ग अंतर्गत तब्बल 11 स्टेशन्स विकसित करण्यात आली आहेत. या मार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून सुरू होते मात्र मध्यंतरी या प्रकल्पाचे काम करताना सिडकोला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे या प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले नाही.
परंतु आता या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे विशेष म्हणजे मेट्रोच्या सुरक्षा आयुक्तांकडून या मार्गावर मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी देखील देण्यात आली आहे. या मार्गावर मेट्रो सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र सिडकोला प्राप्त झाले आहे. यामुळे या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान या मेट्रो मार्गावर 30 ऑक्टोबर 2023 रोजी अर्थातच येत्या पाच दिवसात मेट्रो सुरु होणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांचे गेल्या एका दशकाचे स्वप्न आता प्रत्यक्षात खरे उतरणार असे आशादायी चित्र तयार होत आहे. यामुळे सध्या नवी मुंबई मधील नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.