share-market
share-market

गेल्या दोन वर्षांपासून जागतिक बाजारपेठ कोरोना महामारीच्या छायेखाली असून, अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पण या कठीण काळातही शेअर बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे. काही समभागांनी या काळात बंपर परतावा दिला आणि त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले. जास्त परतावा करणाऱ्या कंपन्यापैकी एक औषध बनवणारी क्वालिटी फार्मा (Quality Pharma) कंपनी देखील आहे. या कंपनीच्या शेअर्सने गेल्या 2 वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांची काळजी घेत सुमारे 1500 टक्के इतका मोठा परतावा दिला आहे.

जेव्हा भारतात कोरोना (Corona) महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला, तेव्हा या स्टॉकची किंमत खूप कमी होती. 27 मार्च 2020 रोजी BSE वर क्वालिटी फार्माच्या एका शेअरची किंमत फक्त 25.55 रुपये होती. सध्या त्याने 400 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

आजही या समभागात BSE वर अपर सर्किट आहे आणि सध्या तो 4.99 टक्क्यांनी मजबूत होऊन 424.75 रुपयांवर व्यवहार करत आहे. त्याने केवळ 2 वर्षांत 1500 टक्के परतावा दिला आहे. क्वालिटी फार्माच्या शेअरची किंमत एकावेळी 1000 रुपयांच्या पुढे गेली होती.

या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 1,117 रुपये आहे. गेल्या 6 महिन्यांत या शेअर्सची जोरदार विक्री झाली आणि या काळात शेअर्सची किंमत सुमारे 30 टक्क्यांनी घसरली. तसेच आपण 1 वर्ष विचार केला तर हा शेअर्स सुमारे 675 टक्क्यांच्या वाढीसह, तो आज सर्वोत्तम मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock) पैकी एक बनला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी क्वालिटी फार्माच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या पोर्टफोलिओचे मूल्य सुमारे 8 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 16 लाखांपेक्षा जास्त झाले असते.

सध्या BSE वर क्वालिटी फार्माचा एमकॅप सुमारे 440 कोटी रुपये आहे. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, क्वालिटी फार्मा कोविड-19 (Covid-19) च्या उपचारांसाठी परवडणाऱ्या दरात रेमडेसिविर (Remedesivir) इंजेक्शन तयार करते.

2016 मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झालेली ही कंपनी सायटोटॉक्सिक औषधे (Cytotoxic drugs) देखील बनवते. ही कंपनी विविध प्रकारचे कॅप्सूल, आय-इयर ड्रॉप्स, क्रीम, गोळ्या, सॅनिटायझर, इंजेक्शन्स इत्यादींचे उत्पादन देखील करते. या कंपनीचे पंजाब आणि हिमाचल प्रदेशात फार्मास्युटिकल प्लांट आहेत.